आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद - पाकिस्तानच्या खैबर आदिवासी पट्टय़ात लष्कराने केलेल्या कारवाईत 35 अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. यादरम्यान एका जवानाचाही मृत्यू झाल्याची माहिती लष्कराने रविवारी दिली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत पाच जवान व 15 अतिरेकी जखमी झाले.
खैबर एजन्सीतील मैदान भागावर अतिरेक्यांच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने अतिरेक्यांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. जवानांनी देरास्तानी भागावर नियंत्रण मिळवले आहे. या ठिकाणावरून मैदान व कुकी खेल खोर्यावर निगराणी ठेवणे सोपे जात असल्याचे लष्कराने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. कुर्रम एजन्सीतील मुहंमदी व खैबर एजन्सीतील हैदर कांदो भागातून अतिरेक्यांना हुसकावून लावल्यानंर मैदान प्रदेशात कारवाई सुरू करण्यात आली. दरवाजगाई कांदो डोंगर रांगातील अतिरेक्यांना माघार घेणे भाग पडले आहे.
तालिबानने आदिवासी पट्टय़ातील डझनभर जिल्ह्यांवर नियंत्रण मिळवल्यानंतर लष्कराने काही आठवड्यापूर्वी खैबर एजन्सीमध्ये अतिरेक्यांविरोधात मोहीम उघडली. हल्ल्यातील जखमींची नेमकी संख्या उपलब्ध होऊ शकली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.