आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Army Chief Gen Raheel Sharif, Asked PM Sharif To Hang All Terrorists

पाकिस्तान : 48 तासांत 3000 दहशतवाद्यांना फाशी द्या, लष्करप्रमुखांचा शरीफ यांच्यावर दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पाकचे लष्करप्रमुख राहील शरीफ आणि पीएम नवाझ शरीफ (डावीकडून उजवीकडे)
इस्लामाबाद - पेशावर मध्ये केलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना तुरुंगात कैदेत असलेल्या 3 हजारहून अधिक दहशतवाद्यांना 48 तासांच्या आत फाशी द्यावी असे म्हटले केले आहे. राहील शरीफ यांनी ट्वीट केले आहे की, मी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना सर्व दहशतवाद्यांना फाशी देण्यास सांगितले आहे. 3 हजारहून अधिक दहशतवाद्यांना पुढच्या 48 तासांच फाशी द्यायला हवी.

तालिबानला इशारा
जनरल शरीफ यांनी ट्वीटरवरच दहशतवाद्यांच्या विरोधात युद्ध पुकारल्याची घोषणा केली होती. त्यांनी ट्वीट केले होते की, खूप झाले. आता दहशतवाद्यांच्या बाजुने बोलणा-या लोकांच्या विरोधात कारवाई करायलाच हवी. जेव्हा पाकिस्तानी लष्कर पेशावरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढत होते, त्याचवेळी जनरल शरीफ यांनी ट्वीटरवर खैबर पख्तूनवा प्रांतात दहशतवाद्यांच्या तळावर मोठा हवाई हल्ला केल्याची माहिती दिली होती. तासभरात 10 हवाई हल्ले केल्याचेही त्यांनी सांगितले. दुस-या एका ट्वीटमध्ये जनरलने तालिबानला म्हटले आहे की, 'तहरीक ए तालिबानसाठी संदेश - तुम्ही आमच्या मुलांना मारले आहे. त्याची किंमत तुम्हाला मोजावीच लागणार आहे. या चिमुकल्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा मोबदला आम्ही घेऊ. हे माझे वचन आहे.

नवाज शरीफ यांनीही केले ट्वीट
तालिबानच्या विरोधात पंतप्रधान नवाझ यांनीही ट्वीट केले. पंतप्रधानांनी लिहिले की, तालिबान, पाकिस्तान आर्मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि तुम्हाल संपवूनच राहील. पण ते तुमच्या बायका मुलांवर हल्ला करणार नाहीत. ते तुमच्या सारखे नाहीत. शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला लष्कराला पाठिंबा देण्याचे आव्हानही केले.
पुढे वाचा, पाकिस्तानात पहिल्या टप्प्यात केवळ 17 दहशतवाद्यांना होणार फाशी, पेशावर हल्ला प्रकरणी 17 जणांविरोधात एफआयआर