इस्लामाबाद - कराची विमानतळावर झालेल्या हल्ल्यामागे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नव्या सुरक्षा टीमचा हात असल्याची गरळ पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जमात उद दावा या संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदने ओकली आहे. हाफीजने ट्वीटरवर प्रतिक्रिया पोस्ट केली आहे. देशाचा शत्रू कोण आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. मोदी आणि त्यांच्या नव्या सेक्युरीटी टीमचे हे काम असल्याचे हाफीजने पोस्ट केले आहे.
दरम्यान, त्याआधी कराची विमानतळावर रविवारी रात्री उशीरा दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर सुमारे साडे पाच तास दोन्ही बाजुने झालेल्या गोळीबारानंतर पाकिस्तानच्या अधिका-यांनी सोमवारी सकाळी ऑपरेशन संपल्याची घोषणा केली. पण त्यानंतर काही वेळातच पुन्हा फायरिंग सुरू झाल्याचे एका पाकिस्तानी वाहिनीने म्हटले आहे. या हल्ल्यात 13 नागरिकांची बळी गेला असून, 10 दहशतवाद्यांनाही ठार करण्यात आले आहे.
प्रत्येक ठिकाणी हाय अलर्ट
पोलिसांच्या गणवेशात आलेल्या या दहशतवाद्यांकडे मशीनगन आणि रॉकेट लाँचर होते. पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार एकूण 26 जण ठार झाले असून त्यात 10 दहशतवाद्यांचा समावेश आहे. अधिका-यांच्या मते सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. पाकिस्तानच्या सर्वच विमानतळांवर हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तर भारतातही सर्व विमानतळांवर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा
विमानतळ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व दहशतवादी सुरक्षारक्षकांच्या वेशात होते. त्यांच्या शरिरावर मोठ्या प्रमाणात दारुगोळा लादलेला होता. त्यामुळे सुरक्षारखदांनी त्यांना गोळी मारताच स्फोट झाले. विमानतळात प्रवेश करताच दहशतवाद्यांनी दोन विभागात विमानतळावर कब्जा केला होता. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर लॉन्चर, हाथगोळे, मशीनगन जप्त करण्यात आले.
तहरीक-ए- तालिबान ने घेतली जबाबदारी
दहशतवादी संघटना तहरीक-ए- तालिबानने या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ स्थानिक तालिबान्यांशी चर्चा करणार आहेत. त्यापूर्वीच झालेल्या या हल्ल्यामुळे वातावरणातील तणाव वाढला आहे. या हल्ल्यानंतर विमानतळावर लागलेल्या आगीमुळे दूरपर्यंत धुराचे लोट दिसत होते. एअरपोर्टच्या व्हीआयपी टर्मिनलवर असणा-या दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षारक्षकांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले.
पुढे पाहा : या हल्ल्याशी संबंधित काही फोटो