आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Army Pounds Militant Hideouts, 20 Dead News In Marathi

वायव्य पाकिस्तानमधील हवाई हल्ल्यात 20 अतिरेकी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - शांती चर्चा फिसकटल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांच्या विरोधात लष्कराची मोहीम रविवारीदेखील सुरूच होती. वायव्य पाकिस्तानात झालेल्या हवाई हल्ल्यात 20 दहशतवादी ठार झाले.

तालिबानी दहशतवाद्यांवर रविवारी सकाळी जोरदार हल्ला करण्यात आला. हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले. लष्कराने या कारवाईत मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्त केली, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. हांगू जिल्ह्यातील पख्तुनख्वा भागात करण्यात आलेल्या हल्ल्यात 9 जण ठार झाले. गेल्या आठवड्यातही हवाई दलाने हल्ला केला होता. त्यात किमान 40 दहशतवादी ठार झाले होते. लष्कर आणि सरकारने घेतलेल्या संयुक्त निर्णयात ही कारवाई करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून देशात हिंसाचार सुरू आहे. त्यात किमान 40 हजार निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. ही समस्या सोडवण्यासाठी तेहरिक-ए-तालिबानसोबत वाटाघाटी करण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला होता. परंतु शांती चर्चा सुरू असतानाच तालिबानने 2010 मध्ये 23 जवानांचे अपहरण करून त्यांचा शिरच्छेद केल्याची कबुली दिली होती.

तालिबानच्या युद्धभूमीत भारतीय डॉक्टरची रुग्णसेवा
कंदहार - युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील दक्षिण प्रांतात नागरिकांची सेवा करण्यात एकमेव डॉक्टर अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे हे डॉक्टर भारतीय आहेत. डॉ. शहा नवाझ असे त्यांचे नाव आहे. नवाझ (45) हे येथे एका खासगी रुग्णालयात आहेत. लोकांची सेवा करण्यात आपल्याला आनंद मिळतो, असे ते म्हणतात.

50 हजार आदिवासींचे उत्तर वजिरीस्तानातून स्थलांतर
इस्लामाबाद - उत्तर वजिरीस्तानातून सुमारे 50 हजार नागरिकांनी स्थलांतर केल्याचे उजेडात आले आहे. तालिबानींवरील लष्करी हल्ल्याची भीती लक्षात घेऊन वजिरीस्तानातील नागरिकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानातील सात स्वायत्त राज्यांपैकी असलेल्या वजिरीस्तानमध्ये सध्या कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे लयाला गेली आहे.