आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिगेड-111 : सत्तांतर घडवणारी लष्कराच्या ‘एक्स कॉर्प्स’चे स्पेशल युनिट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानी लष्कराच्या 111 इन्फन्ट्री ब्रिगेडचे कमांडर फहीम राव यांना हटवून सरफराज अली यांची कमांडरपदी नियुक्ती केली आहे. पाकिस्तानमध्ये आजपर्यंत झालेल्या तख्तपालटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे ही लष्कराचे रावळपिंडीस्थित एक्स कॉर्प्स युनिट आहे. या युनिटच्या प्रमुखांनी आजपर्यंत तीन वेळा पाकिस्तानमध्ये लोेकशाही गुंडाळून ठेवून स्वत: सत्ता काबीज केली आहे. या ब्रिगेडच्या सैनिकांना विशेष प्रकारचे मानसिक प्रशिक्षण देण्यात येते. ही ब्रिगेड पाकिस्तानच्या राजकीय, सामाजिक अथवा धार्मिक अशा सर्व प्रकारच्या समुदायांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ही ब्रिगेड अत्यंत गनिमी पद्धतीने आणि शांततेने काम करते.
ब्रिगेड-111
मुख्य कार्य : द्रुतगती कारवाईसाठी या ब्रिगेडची स्थापना करण्यात आली होती, मात्र आजपर्यंत ही ब्रिगेड तख्त पालटण्यासाठीच प्रसिद्ध आहे. पाकमध्ये मार्शल लॉची अंमलबजावणी करण्याचे इत्थंभूत प्रशिक्षण या ब्रिगेडला देण्यात आले आहे. मानसिकदृष्ट्या पाकिस्तानी नागरिकांना लष्कराच्या बाजूने उभे करण्याचे प्रचंड कौशल्य या ब्रिगेडकडे आहे.
मोहिमा : आॅपरेशन फेअर प्ले, भारत- पाक युद्ध (1965), सियाचीन वाद, कारगिल युद्ध (1999), आॅपरेशन सायलेन्स आणि आॅपरेशन जांबाज
आतापर्यंत तीन वेळा तख्तपालट : 63 पैकी 32 वर्षे लष्करी राजवट
1958- 1971: मेजर जनरल सिकंदर मिर्झा यांनी पंतप्रधान फिरोज खान नून यांना पदच्युत केले. मिर्झा यांनी लष्करप्रमुख अय्युब खान यांंची मार्शल लॉ प्रशासक म्हणून नियुक्ती केली. 13 दिवसांनंतर अय्युब खान यांनी मिर्झा यांना पदच्युत करून स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले. अय्युब खान यांची लष्करी राजवट 13 वर्षे (1971 पर्यंत) राहिली.
कारण : उर्दूला राष्ट्रभाषेचा दर्जा दिल्यामुळे पूर्व पाकिस्तानात मोठा विरोध झाला होता. मिर्झा यांना बांग्ला हवी होती. 1953 मध्ये याच मुद्द्यावरून पेटलेल्या दंगलींनंतर लष्कराकडे सत्ता सोपवण्यात आली होती. 1958मध्ये पुन्हा वाद उफाळून आल्यानंतर लष्कराने सत्ता काबीज केली.
1977-1988: 4 जुलै 1977 रोजी जनरल झिया उल हक यांनी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो आणि त्यांच्या पक्षाच्या अन्य सदस्यांना अटक करून नॅशनल असेंब्ली विसर्जित केल्याची
घोषणा केली आणि स्वत:ला राष्ट्रपती घोषित
केले. ही लष्करी राजवट 11 वर्षे (1988
पर्यंत) राहिली.
कारण : निवडणुकीमध्ये झुल्फिकार अली भुत्तो यांचा पक्ष विजयी झाला होता. विरोधी पक्षांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हेराफेरी
झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर लष्कराने सत्ता काबीज केली आणि भुत्तो यांना अटक करून फाशी दिली.
1999- 2007 : लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पदच्युत करून स्वत:ला राष्ट्रपती घोषित केले. मुशर्रफ यांची लष्करी राजवट 8 वर्षे (2007 पर्यंत) राहिली. मुशर्रफ यांना पदच्युत झाल्यानंतर देश सोडून परांगदा व्हावे लागले.
कारण : पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ आणि आयएसआय प्रमुख जियाउद्दीन बट्ट यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता. मुशर्रफ यांचे विमान उतरण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर शरीफ यांच्या विरोधात गेले. त्यानंतर लष्कराच्या प्रमुख अधिका-यांनी तख्तपालट करुन सत्ता काबीज केली होती.
फसलेले बंड
1949: मेजर जनरल अकबर खान यांनी पंतप्रधान लियाकत खान यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. हे बंड रावळपिंडी षड्यंत्र या नावाने ओळखले जाते.
1980: मेजर जनरल तजम्मुल हुसेन मलिक यांनी तख्तपालट करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पंतप्रधान झिया उल हक यांच्या सरकारने हा प्रयत्न उधळून लावला.
1995 : पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी मेजर जनरल जहिरुल इस्लाम अब्बासी यांचा सत्ता काबीज करण्याचा इरादा धुळीस मिळवला होता.
तख्तपालट झाला तर...
कयानी राष्ट्रपती होऊ शकतात.
गिलानी आणि झरदारी यांच्याविरुद्ध खटला चालू शकतो.
माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना क्षमादान मिळू शकते.
सत्तेची सूत्रे मुशर्रफ यांच्याच हाती सोपवली जाण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
पुढील वर्षी होणा-या राष्ट्रीय निवडणुका टाळल्या जाऊ शकतात.