आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्य दिनी नवाज शरीफ यांची डरकाळी, \'जगाने आम्हाला कमी लेखू नये\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनी पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आम्हाला कमी समजू नका अशी डरकाळी फोडली आहे. गेल्या एक आठवड्यापासून एलओसी आणि भारतीय लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार करणा-या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्यांच्या देशातील लोकांना शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे.

शरीफ यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यातील भाषणात दहशतवादावर चिंता तर, पाकिस्तानच्या ताकदीचा वारंवार उल्लेख केला. शरीफ यांनी देशवासीयांना विश्वास दिला, की देश लवकरच दहशतवादाच्या कचाट्यातून मुक्त होईल आणि शांती व सुरक्षेचे केंद्र बनेल. त्यांनी या कामासाठी लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांची मदत आवश्यक असल्याचे नमुद केले. पाकिस्तान स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संयुक्त राष्ट्राचे प्रमुख बान की मुन उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमीत्त पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये 31 आणि प्रत्येक राज्याच्या राजधानीत 21 बंदूकींची सलामी देण्यात आली.

पुढील स्लाइडला क्लिक करून पाहा, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन सोहळा