सैदानशाह - पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील सैदानशाह येथील कोळसा खाणीचे हे आहे छायाचित्र. पाकिस्तानमध्ये खाणीत काम करणा-यांची स्थिती फार विदारक आहे. आजही येथील कामगार खोरे-घमेल्यांचा कोळसा काढण्यासाठी वापर करतात आणि त्याची वाहतूक गाढवाच्या मदतीने करतात. कोळसा खाणीत काम करण्यासाठी खासगी ठेकेदार इतर प्रांतातील मजूर आणतात. चार मजूर दिवसभरात एक टन कोळसा काढतात. त्यांना फक्त 613 रूपये मजूरी दिली जाते. त्यांची चौघात विभागणी केली जाते. मात्र कोळसा खाणीत काम करणारे बहुतेक हे बालमजूर असतात. पाकिस्तान संविधानाने बालमजूरीला बंदी घातली आहे. खाणीत काम करणा-यांना कोणत्याही सुविधा मिळत नाही.
पुढे पाहा कोळसा खाण आणि मजूरांची हाल छायाचित्रांमधून ....