आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशनिंदेवरून दंगल; तीन ठार, फेसबुक पोस्ट करणारा अहमदिया मात्र बचावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये फेसबुकवर ईशनिंदा केल्याच्या आरोपावरून संतप्त जमावाने तिघांची हत्या केली. यामध्ये सात वर्षांची मुलगी, तिची लहान बहीण आणि आजीचा समावेश आहे.

फेसबुकवर ईशनिंदेची पोस्ट करणारा तरुण बचावला आहे. अल्पसंख्याकांविरुद्ध वाढत्या रोषाचा हा परिणाम असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुजरांवालामध्ये ही घटना घडली. ईशनिंदेविरोधात तक्रार देण्यासाठी 150 लोक पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी या वेळी अहमदिया समुदायावर आरोप लावले. त्यांची तक्रार लिहून घेण्याच्या आत साधारण 250 लोकांनी अहमदिया समाजाच्या वसाहतीवर हल्ला चढवला. त्यांनी लुटालूट करून तिघांची हत्या केली. पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट करणारा अहमदिया होता.

100 जण आरोपी
या वर्षी पाकिस्तानमध्ये 100 जणांवर ईशनिंदा प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिकतेच्या आधारे परस्पर द्वेषांतून असे गुन्हे दोन्ही समाजाचे लोक नोंदवले जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. असे आरोप करून अनेकांची संपत्ती हडपली जाते.

पाक कायद्यानुसार अहमदिया मुस्लिम नाहीत
सन 1984 च्या एका पाकिस्तानी कायद्यानुसार अहमदिया समाजाने स्वत:ला मुस्लिम मानण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे अहमदिया स्वत:ला मुस्लिम मानू शकत नाहीत तसेच ईदगाहला मशीद म्हणू शकत नाही. चार वर्षांपूर्वी अहमदियांच्या ईदगाहवर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 86 जण ठार झाले होते.

(छायाचित्र : संग्रहित छायाचित्र)