आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Court Issues Arrest Warrant Without Bail For Musharraf

31 पर्यंत हजर न राहिल्यास तुरुंगात टाकू : न्यायालय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- 31 मार्चपर्यंत हजर व्हा, अन्यथा तुरुंगात टाकू, असे पाकिस्तानातील विशेष न्यायालयाने माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांना सुनावले आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला सुरू आहे. मुशर्रफ यांच्याविरोधात सशर्त अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. अशी माहिती विशेष न्यायालयाचे रजिस्ट्रार अब्दुल घनी सुमरू यांनी दिली.

दुसरीकडे आदेशाची प्रत मिळाल्यानंतर त्याला आम्ही आव्हान देऊ. न्यायालयाचे कामकाज 20 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणावरून मुशर्रफ न्यायालयापुढे हजर राहू शकलेले नाही, असे संरक्षण विभागाकडून सांगण्यात आले. सिंध उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती फैजल अरब यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय पीठाने हे वॉरंट बजावले. दरम्यान, मुशर्रफ यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. त्यामुळे मुशर्रफ यांना अटक करण्यात यावी, असे सरकारी वकील अक्रम शेख यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या हुकूमशहावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येत आहे.