इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये सरकारविरुध्द चालू असलेल्या आंदोलनात सहभागी लोकांचे लक्ष्य आता सर्वोच्च न्यायालय आणि लष्कराकडे लागली आहे. पाकिस्तान पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी तहरीक-ए-इन्साफ पक्षांने (पीटीआय) सुरु केलेले आंदोलन न्यायालयात पोहोचले आहे.
पीटीआयचे वरिष्ठ नेते इशाक खान खाकवानी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात पंतप्रधान शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे इम्रान खान आणि तहीर उल कादरी यांच्याविरुध्द दहशतवादी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता न्यायालयातही संघर्ष लढला जाणार आहे. दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुखांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सोमवारी भेट घेतली. देशातील गंभीर राजकीय परिस्थितीवर दोघांनी चर्चा केली. शरीफ यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा सल्ला लष्करप्रमुख राहील यांना दिल्याचे, माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे. हे वृत्त सरकार आणि सेनाने फेटाळले आहे.
तीन महिन्यांकरिता नवाझ यांनी राजीनामा द्यावा- लष्कर
लष्करप्रमुख राहील शरीफ यांनी पंतप्रधानांना तीन महिन्यांकरिता पदावरुन दूर जाण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे सार्वजनिक निवडणुकीतील घोटाळ्याचे चौकशी करत येऊ शकते. मात्र हे वृत्त सरकारने फेटाळले आहे.
सरकारने वृत्ताचे केले खंडन
पंतप्रधानांचा तीन महिन्यांकरिता राजीनामा या वृत्ताचे पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्यांने निराधार असल्याचे सांगितले. तर लष्कराचा प्रवक्त मेजर जनरल असिम बाजवा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा लष्करप्रमुखांनी राजीनामा मागितल्याचे वृत्त चुकीचे आहे. ही बातमी म्हणजे एक अपप्रचार असल्याचे पंतप्रधान यांची कन्या मरियम शरीफ यांनी सांगितले.
14 ऑगस्टपासून सुरु आहे आंदोलन
इम्रान खान आणि कादरी यांनी नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी 14 ऑगस्टपासून आंदोलन सुरु करण्यात आले आहे. शरीफ यांच्यावर सार्वत्रिक निवडणुकीत गैरवर्तन केल्याचे दोन्ही नेत्यांचा आरोप आहे. सोमवारी( ता. एक) या आंदोलनास हिंसक वळण मिळाले. यात 3 लोक मृत, तर 100 लोक जखमी झाली आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाकिस्तानमधील सरकारविरुध्द चालू असलेल्या आंदोलनाचे छायाचित्रे...