आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरबजितच्या आयुष्यातही चांगले दिवस येतील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरबजित व सुरजित या दोन नावांत एक ‘उ’कार व एका ‘ब’ चा फरक आहे. पण या फरकामुळेच एका कैद्याची तुरुंगातून सुटका झाली व दुसरा त्या दिवसाच्या प्रतीक्षेत आहे. आपल्याही आयुष्यात तो दिवस उगवेल व कित्येक वर्षांनंतर आपण कुटुंबीयांना भेटू, अशी आस तो उरात बाळगून आहे.
जुने वाद चर्चेच्या माध्यमातून सुटावेत व कैद्यांच्या शिक्षेत कपात किंवा सुटका करण्याच्या मुद्द्यांचे राजकारण होऊ नये,अशी पाकिस्तानातील बहुतांश नागरिकांची इच्छा आहे. सुरजितची सुटका झाल्याचा येथील अनेकांना आनंद झाला. सरबजितची मृत्युदंडाची शिक्षा जन्मठेपेत रूपांतरित व्हावी व नंतर तीही माफ व्हावी, अशीही अनेकांची इच्छा आहे. सरबजितसिंह लवकरच कुटुंबीयांना भेटेल व खलील चिश्तीप्रमाणे त्याच्याही जीवनात चांगले दिवस येतील, अशी येथील अनेकांना आशा आहे.
सरबजितसंदर्भात बीबीसी उर्दू सेवा पुरवणाºयांनी म्हटले की बातमीसाठी चांगला मुद्दा मिळाला होता. तीन-चार दिवसांच्या बातमीची तजवीज झाली होती. पण दुसºया दिवसाची सकाळ माध्यमांसाठी वेगळेच वृत्त घेऊन आली. राष्टÑाध्यक्षांच्या प्रवक्त्यांनी जाहीर केल्यामुळे समजले की सुरजितची सुटका झाली आहे व त्या सुटकेचा राष्टÑाध्यक्ष निवासाशी काहीएक संबंध नाही. पण पाकिस्तान व हिंदुस्थानात न्यूज चॅनल्सनी आपापल्या खास शैलीत त्यापूर्वीच बातम्या प्रसारित करण्यास सुरुवात केली होती. हिंदुस्थानी टीव्ही चॅनल्सनी सरबजितच्या घरी ढोल-ताशांच्या गजरात सुरू असलेला भांगडा दाखवला. परिसंवाद झाले, सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपापली मतेही व्यक्त केली. टीव्हीवरील सूत्रसंचालकांनी तर कमालच केली. बातमी पडताळून घेण्यापूर्र्वीच त्यावर टॉक शो घेतले. या सुटकेच्या वृत्ताचा आधार घेत एकमेकांवर टीका करणारे राजकारणीही कौतुकास पात्र आहेत. बातमी बदलली. मीडियाने एकापाठोपाठ एक बातम्या देत व लागोपाठ परिसंवाद घेत एक-दोन दिवस काढले. माध्यमांसाठी शानदार ठरलेल्या या न्यूज कव्हरेजमुळे सरबजितच्या मुलीवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. त्या मुलीला आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर बसवून तेथून दु:खाच्या दरीत तिचा कडेलोट झाला तेव्हा तिच्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची कल्पना करणेही कठीण आहे. या ठिकाणी मी हेही नमूद करू इच्छिते की भारताच्या राष्ट्रपती माननीय प्रतिभा पाटील यांनी अनेकांची फाशीची शिक्षा रद्द केली, यावर तुमच्याकडे हरकत घेतली जात असली तरी, आमच्या येथे अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काही दिवसांपूर्वी आमच्या पीटीव्हीचे एक सेलिब्रिटी उबैदुल्ला बेग यांनी या जगाचा निरोप घेतला. ज्यांनी 70 किंवा 90 च्या दशकात पीटीव्हीवरील ‘कसौटी’ कार्यक्रम पाहिला असेल, त्यांना उबैदुल्ला बेग आठवत असतील. त्यांचे घर बरेलीत होते, जन्म रामपूरमध्ये झाला होता व आयुष्य पाकिस्तानात गेले. त्यांच्या दोन कादंबºयांसाठीही ते साहित्य जगतात ओळखले जातात. फाळणीनंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांची पहिली कादंबरी ‘और इन्सान जिंदा है’ प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी आहे ‘राजपूत’. 1945 हे वर्ष स्वातंत्र्याचे शुभसंकेत घेऊन आले. भारतीय उपखंडातील 40 कोटी लोक येणाºया दिवसांची वाट पाहत होते. पण पाचशेपेक्षा अधिक संस्थानिकांना त्यांच्या भविष्याची काळजी भेडसावत होती. स्वतंत्र हिंदुस्थानावर राजपुतांची सत्ता स्थापन करण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्या मदतीसाठी काही मुसलमान, काही श्रीमंत ब्रिटिश व काही लष्करी अधिकारीही सज्ज होेते. त्याच सर्व घटनाक्रमाच्या आधारे ही कादंबरी फुलत जाते. भारतीय
उपखंडातील या गंगाजमनी संस्कृतीकडे जिव्हाळ्याने पाहणाºयांपैकी आमच्याकडील वरदहस्त लेखक काळाच्या पडद्याआड जात आहेत, ही आमच्यासाठी मोठी हानी आहे.
माध्यमांच्या दृष्टीने शानदार असलेल्या त्या न्यूज कव्हरेजमुळे सरबजितच्या मुलीवर दु:खाचा डोंगर कोसळला. दोन्ही देशांमधील जुने वाद चर्चेच्या माध्यमातून सुटावेत व कैद्यांच्या मुद्द्याचे राजकारण होऊ नये, अशी पाकिस्तानातील बहुतांश नागरिकांची इच्छा आहे.