आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Election: Nawaz Sharif \'set For Victory\'

तिस-यांदा पंतप्रधान होणार नवाज शरीफ, मनमोहन सिंग यांनी दिल्‍या शुभेच्‍छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानमधून आतापर्यंत आलेल्‍या निकालांवरून नवाज शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एनने मजबूत आघाडी घेतली आहे. सत्तारूढ पीपीपी आणि इमरान खानच्‍या पाकिस्‍तान तहरीक ए इन्‍साफ (पीटीआय)मध्‍ये काटयाची लढत सुरू आहे. इमरान खानने आपला पराभव स्‍वीकार केला असून कौमी मुव्‍हमेंटचे नेते अल्‍ताफ हुसेन यांनी नवाज शरीफ यांना शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही नवाज शरीफ यांना शुभेच्‍छा देऊन भारत भेटीचे आमंत्रण दिले आहे.

आतापर्यंत 272 पैकी 192 जागांचे निकाल जाहीर झाले असून पाकिस्‍तान मुस्लिम लीगने 101, तहरीके ए इन्‍साफने 25, पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टीने 19 तर इतर पक्षांना मिळून 47 जागा मिळाल्‍या आहेत.

नवाज शरीफ सरगोधा येथून निवडून आले आहेत. तर इमरान खानने पेशावरमध्‍ये विजय मिळवला आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लाहोर येथील पक्षाच्‍या मुख्‍यालयातून आपल्‍या समर्थकांना संबोधित केले. 'अल्‍लाने पुन्‍हा एकदा देशाची सेवा करण्‍याची संधी दिली आहे. आम्‍ही सगळयांना एकत्रित घेऊन पुढे जाणार आहोत. मी सर्व पक्षांना अपील करतो की, सगळयांनी माझ्याशी देशाच्‍या समस्‍या सोडवण्‍यासाठी चर्चा करावी. निवडणुकीत जे यश मिळाले आहे. यामध्‍ये सर्वांचा सहभाग मोठा आहे. आमच्‍याबद्दल ज्‍यांनी-ज्‍यांनी चांगले वाईट बोलले असेल, त्‍या सर्वांना मी माफ करतो. देशाची परिस्थिती बदलणे हेच आमचे मुख्‍य काम आहे. आम्‍ही तरूणांना जे वचन दिले होते. ते सर्व आम्‍ही पूर्ण करू' असे ते म्‍हणाले.

पंतप्रधानांचा झाला पराभव
या निवडणुकीत सर्वाधिक फटका झरदारींचा सत्तारूढ पक्ष पीपल्‍स पार्टीला बसला आहे. झरदारींचा पक्ष तिस-या स्‍थानी जाताना दिसतोय. इमरान खानचा पक्ष तहरीक ए इन्‍साफ दुसरे स्‍थान मिळवण्‍यात यशस्‍वी झाला आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष पाकिस्‍तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल एन) सर्वात पुढे आहे. सर्वात आश्‍चर्यकारक निकाल म्‍हणजे झरदारी यांच्‍या पक्षाकडून पंतप्रधानपदी राहिलेले राजा परवेज अशरफ यांचा पराभव. अद्यापही 272 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

सत्ता स्‍थापनेसाठी हवेत 170 जागा
पाकिस्‍तानमध्‍ये सत्ता स्‍थापनेसाठी 170 जागांची आवश्‍यकता आहे. सध्‍याच्‍या निकालांनुसार पाकिस्‍तान मुस्‍लीम लीग नवाज (पीएमएल एन) 126, तहरीक ए इन्‍साफ 34 आणि पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टी 32 जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष आणि इतर पक्ष 71 जागांवर आघाडीवर आहेत.

शनिवारी पाकिस्‍तानच्‍या नॅशनल असेंब्‍लीसाठी 272 जागांसाठी मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्‍या माहितीनुसार सुमारे 54 टक्‍के मतदान झाले. 2008 मध्‍ये झालेल्‍या निवडणुकीत 44 टक्‍के मतदान झाले होते. निवडणुकीवेळी अनेक ठिकाणी बॉम्‍बस्‍फोट झाले होते. या घटनांमध्‍ये 24 लोक मरण पावले होते.