आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan Firm On Its Stand That America Should Apologize Over Nato Strike

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेने माफी मागावीः नाटो हल्‍ल्‍याप्रकरणी पाक ठाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या नाटो हल्ल्याप्रकरणी अमेरिकेने माफी मागितली पाहिजे. तसे झाले तरच सहा महिन्यांपासून दोन्ही देशांतील तणाव निवळण्यास मदत होऊ शकेल, अशा शब्दांत पाकिस्तानने आपल्या मागणीवर जोर दिला आहे.
या घटनेत 24 जवान ठार झाले होते. त्याबद्दल अमेरिकेने क्षमा मागितलीच पाहिजे, असे आम्हाला वाटते. उभय देशांतील भागीदारीला कायम ठेवायचे असेल तर ही क्षमा महत्त्वाची ठरेल, असे परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी खार यांनी म्हटले आहे. पाकिस्तानच्या संसदेत या आशयाचा ठराव मंजूर झाला आहे. अमेरिकेने या घटनेबद्दल अगोदर माफी मागावी. माफी मागून पाकिस्तानी संसदेचा मान राखावा, अशी अपेक्षा खार यांनी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावरून अमेरिकेने पाकिस्तानवर चांगलाच दबाव वाढवला आहे. त्यामुळे नाटोच्या सैन्याचा रसदीचा मार्ग खुला करण्यावर पाकने तयारी दाखवली आहे, परंतु आता पुन्हा एकदा माफीवर जोर देण्यात आला आहे. दुसरीकडे या मुद्द्यावर माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ओबामा प्रशासनाच्या एका अधिका-याने स्पष्ट केले आहे.
आदिवासी प्रदेशातील धुमश्चक्रीत 20 ठार
अफगाणिस्तान सीमेवरील मोहंमद आदिवासी प्रदेशात दहशतवादी व पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संघर्षात 20 ठार झाले. या धुमश्चक्रीत चार जवानही ठार झाले आहेत. सलाला येथील लष्करी तळास दहशतवाद्यांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी स्फोटकांसह मोठा हल्ला चढवला होता. गेल्या वर्षी सालाला याच लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी चोवीस पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे अफगाणिस्तानकडे जाणारा मार्ग पाकने बंद केला आहे.