आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan :Girl`s Body Dug Out Of Grave, Sexually Assaulted

मानव बनला दानव; पाकिस्तानात तरुणीच्या मृतदेहासोबत प्रणय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर- मावतेला काळामा फासणारी घटना पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घडली आहे. मानव दानवाप्रमाणे कृत्ये करू लागले आहे. गुजरानवाला परिसरातील कब्रस्तानात एका तरुणीच्या मृतदेहासोबत अज्ञात व्यक्तीने प्रणय केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेच्या काही तासांपूर्वी या कब्रस्तानात तरुणीचा दफनविधी करण्‍यात आला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, किला देदार परिसरात गेल्या मंगळवारी एका विद्यार्थिनीचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर संध्याकाळी लाहोरपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरानवाला जिल्ह्यातील कब्रस्तानात तिच्या मृतदेहाला दफन करण्यात आले होते.

बुधवारी सकाळी तरुणीचे कुटूंबिया 'फातिया' वाचण्यासाठी कब्रस्तानात गेले असता, मृतदेह विवस्त्र अवस्थेत कब्रबाहेर पडलेला दिसला. त्यानंतर संतापलेल्या कुटूंबियांने परिसरात रास्तारोको आंदोलन केले. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी आंदोलन मागे घेतले. याप्रकरणी पोलिसांनी कब्र खोदरार्‍याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.