आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Government Creates History By Completing Term

पाकिस्‍तानच्‍या सरकारने कार्यकाळ पूर्ण करुन रचला इतिहास, मुशर्रफही परतणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्‍तानातील लोकशाही सरकारने कार्यकाळ पूर्ण करण्याचा इतिहास रचला आहे. पाकिस्‍तानात प्रथमच लोकशाही सरकारने कार्यकाह पूर्ण केला. भ्रष्टाचार, सर्वोच्च न्यायालयाशी थेट संघर्ष, दोन पंतप्रधान, दहशतवाद अशा समस्यांनी घेरलेल्या पाकिस्तानी पीपल्स पार्टीच्या सरकारने पाच वर्ष पूर्ण केली आहेत.अर्थात हा कार्यकाळ पूर्ण करतानाच सरकारने दोन पंतप्रधान पाहिले. सर्वप्रथम युसुफ रझा गिलानी हे पंतप्रधान होते. परंतु, राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्‍यावर कारवाई करण्‍यात दिरंगाई केल्‍यावरुन सर्वोच्‍च न्‍यायालयाने त्‍यांना अपात्र ठरविले होते. त्‍यानंतर राजा परवेझ अश्रफ पंतप्रधान झाले.

संसद विसर्जित करण्यात आल्यानंतर नवीन निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. काळजीवाहू पंतप्रधान अशरफ यांनी सर्व राजकीय पक्षांसोबत चर्चेस सुरुवात केली. काळजीवाहू पंतप्रधानांच्या देखरेखीखाली आगामी निवडणूक होणार आहे. मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने सर्वांची सहमती घेऊन सरकार स्थापन केले होते.

मुशर्रफ 24 मार्चला परतणार
पाकिस्तानचे माजी राष्‍ट्रपती लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ 24 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये परतणार आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत ऑल पाकिस्तान मुस्लीम लीग पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुशर्रफ पाकिस्तामध्ये येणार आहेत. गेल्या चार वर्षांपासून परवेझ मुशर्रफ दुबई आणि लंडन येथे राहत आहेत.

मुशर्रफ 24 मार्च रोजी व्यावसायिक विमानाने कराचीला येतील. त्यानंतर सुमारे 50 हजार लोकांच्या रॅलीला संबोधित करतील. यावेळी अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिरातीचे सुमारे 4 हजार अनिवासी पाकिस्तानी नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा त्यांच्या पक्षाने केला आहे.