आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Government Starts Talk With Protesters, Divya Marathi

प‍ाकिस्तान सरकारची पुन्हा इम्रान खान, कादरी यांच्याशी चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - विरोधकांबरोबरची पाचवी चर्चेची फेरी अयशस्वी झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने गुरुवारी( ता.28) नव्याने बोलणीला सुरुवात केली. बैठकीत नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळण्‍यात आली आहे. पाकिस्तान तेहर‍िक - ए-इन्साफचे ( पीटीआय) अध्‍यक्ष इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तेहर‍िकचे ( पीएटी) प्रमुख तहीरुल कादरी यांच्याबरोबरील सरकारी पातळीवरील वाटाघाटीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
शरीफ यांनी सार्वजनिक निवडणूकीत केलेल्या गैरकारभारावरून राजीनाम द्यावा, अशी मागणी खान यांनी धरून ठेवली आहे. दुसरीकडे कादरी यांना देशात संपूर्ण क्रांती हवी आहे. हजारो समर्थकांसह हे दोन नेते संसदेसमोर धरणा धरला आहे. आज क्रांतिचा दिवस आहे त्यामुळे संध्‍याकाळपर्यंत मोठी घोषणा होईल, असे कादरी यांना वाटत होते. शरीफ यांनी आज आपले नियोजित तुर्कस्तानचा दौरा रद्द केला. त्यांच्याऐवजी राष्‍ट्राध्‍यक्ष ममनून हुसेन दौ-यावर जाणार आहेत. पा‍किस्तान सरकारने कादरी यांची वैध मागणी स्वीकारावी, असे मुत्ताहिदा कमी मूव्हमेंटचे प्रमुख अल्ताफ हुसेन यांनी केली आहे.