आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Gwadar Quake Island Nasa Satellite Pictures

पाकिस्तान : भूकंपानंतर समुद्रात तयार झाली तीन बेटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये या आठवड्यात झालेल्या भूकंपाचे गंभीर परिणाम समोर येऊ लागले आहेत. भूकंपामुळे समुद्रात तीन बेटे निर्माण झाली असून त्यातून मिथेन वायू बाहेर पडत आहे. दुसरीकडे मृतांचा आकडा 515 पर्यंत पोहोचला आहे. बलुचिस्तानमधील एका अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जवळपास एक लाख लोक बेघर झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. बलुचिस्तानचे मुख्य सचिव बाबर याकूब यांनी सांगितले की, गुरुवारी 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे सर्वाधिक नुकसान झाले. अजूनही भूकंपग्रस्त भागात मृतदेह पडून आहेत. मातीची आणि लाकडांनी बनवलेल्या घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, भूकंपानंतरची परिस्थिती