पाकिस्तानवर २०० दहशतवाद्यांचा हल्ला; ७ जण ठार
agencies | Update - Jun 01, 2011, 06:00 PM IST
ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर पाकिस्तानसमोर दशहवाद्यांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दहशतवाद्यांनी एकप्रकारे पाकिस्तानसोबत युद्धच सुरु केले आहे.
-
ओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर पाकिस्तानसमोर दशहवाद्यांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दहशतवाद्यांनी एकप्रकारे पाकिस्तानसोबत युद्धच सुरु केले आहे. अफगाणिस्तानच्या उत्तर पश्चिमेकडून सीमेकडून २०० दहशतवाद्यांनी पाकिस्तानवर हल्ला केला. यात एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीमेकडुन घुसखोरी केली आणि सीमेवरच्या एका चौकीवर हल्ला केला. ही चौकी पुर्णपणे उध्वस्त झाली आहे. पाकिस्तानवर हल्ल्याचे सावट घोगावतच होते. गेल्याच आठवड्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी नौदलाच्या तळावर हल्ला केला होता.