आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Hindu Temple News In Marathi, Divya Marathi

पाकिस्तानातील मं‍दिरांवर भू-माफियांचा डोळा; रावलपिंडीत कृष्णा मंदिर तेवढे शिल्लक!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानात अल्पसंख्यक हिंदू समुदायाला मंदिरे आणि मंदिराच्या भूखंडाच्या रक्षणासाठी भू-माफियाविरूद्ध संघर्ष करावा लागत आहे. भारत-पाक फाळणीदरम्यान बहुतांश हिंदू भारतात परत गेले होते. परंतु, त्यांची मालमत्ता आणि धार्मिकस्थळे आजही पाकिस्तानात आहेत. आता याच धार्मिक स्थळावर भू-माफियांचा डोळा आहे. बनावट दस्तऐवज तयार करून त्यांनी अनेक भूखंड बळकावल्याचेही समोर आले आहे.

'एक्सप्रेस ट्रिब्यून'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, भारतात परत गेलेल्या हिंदू समुदायाच्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता भू-माफियांनी बळकावल्या आहेत. एवढेच नव्हे तर बनावट दस्ताऐवज तयार करून हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या परिसरातील जागाही परस्पर हस्तांतरीत करून घेतल्या आहेत. धार्मिक स्थळाला लागून असलेल्या भूखंडाच्या किंमती जास्त आहेत. त्यामुळे भू- माफिया येत्या काही दिवसांत सगळ्या धार्मिक स्थळांचा ताबा घेतील, अशी भीतर कीर्तपुरामधील एका हिंदू रहिवाशाने व्यक्त केली आहे.

रावलपिंडीमध्ये पाच हजारांहून अधिक हिंदू राहतात. परंतु, तिथे कृष्णा मंदिर हे हिंदूंचे एकमा‍त्र धार्मिक स्थळ शिल्लक आहे.