Home | International | Pakistan | pakistan jounalists handled weapon

स्वरक्षणासाठी पाकिस्तानातील पत्रकारही बाळगणार आता शस्त्रे

agency | Update - Jun 01, 2011, 08:32 PM IST

पाकिस्तानमधील पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी हलकी व दुय्यम दर्जाची शस्त्रे वापरण्याची परवानगी सरकारने बुधावरी दिली.

  • pakistan jounalists handled weapon

    पाकिस्तानमधील पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी हलकी व दुय्यम दर्जाची शस्त्रे वापरण्याची परवानगी सरकारने बुधावरी दिली. मंगळवारी आयएसआयने अपहरण केलेल्या सय्यद सलीम शहाजाद या पत्रकाराची हत्या करम्यात आली. त्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले.

    लष्करातील सैनिकाप्रमाणेच सर्व पत्रकारांनाही आपले रक्षण करण्याचा हक्क असून त्यामुळेच हा निर्णय घेतला असून शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात येत आहे. शहाजाद प्रकरणात आयएसआयच्या सहभागाची चौकशी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तसेच शहाजादचा मृत्यू "वैयक्तिक' कारणावरूनही झाला आहे काय याचीही तपासणी केली जाईल, असे मलिक म्हणाले.

Trending