आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Journalist Like Indian Journalist,Mushraff's Advocate Remarked

पाकिस्तानी पत्रकार ‘भारतीय’ पत्रकारांप्रमाणे झाले, मुशर्रफ यांच्या वकीलांची मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावरील दहशतवादी खटल्याची सुनावणी गुरुवारी झाली, परंतु सुनावणीऐवजी मुशर्रफ यांचे वकील अहमद रझा कसुरी यांच्या विधानामुळे अधिक वादंग निर्माण झाले. प्रसारमाध्यमांच्या अडचणीत आणणा-या प्रश्नांमुळे बिथरलेल्या कसुरी महाशयांनी पाकिस्तानी पत्रकार ‘भारतीय’ पत्रकारांप्रमाणे झाले आहेत. तुमची लाज वाटते, अशी मुक्ताफळे उधळली.
तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत ‘भारतीय’ वाटू लागली आहे. जणू तुम्हाला कोणीतरी पैसे देऊन विकत घेतल्यासारखे तुमचे वागणे झाले आहे. तुमचा सूर भारतीय पत्रकारांसारखा वाटत आहे. तुमची लाज वाटते. जे लोक विकले जातात, तुम्ही त्यापैकी आहात. तुम्ही लोकांनी पत्रकारितेमध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टी आणल्या आहेत, असे कसुरी यांनी विशेष न्यायालयाच्या बाहेर म्हणाले. त्या वेळी उपस्थित पत्रकार त्यांच्याकडे नुसतेच पाहत राहिले. त्यानंतर कसुरी तणतणत कोर्टाबाहेरील मुशर्रफ यांच्या समर्थकांमध्ये सामील झाले. समर्थकांनी पत्रकारांच्या विरोधात ‘शेम..शेम.. ’ असे नारे दिले. मुशर्रफ यांच्या कायदेपंडितांच्या चमूचे कसुरी सदस्य आहेत. काही पत्रकारांनी विचारलेला प्रश्न अतिशय आक्षेपार्ह स्वरूपाचा होता, असे सांगण्यात आले. परंतु त्याचा तपशील मात्र समजू शकला नाही. पत्रकारांच्या प्रश्नानंतर कसुरींचा राग स्वाभाविक असल्याचे मानले तरी भारतीय पत्रकारांवर घसरण्याचा प्रकार धक्कादायक आहे.