Home | International | Pakistan | pakistan, karachi, rada, 11 killed

कराचीत हिंसा भडकली, ११ ठार

वृत्तसंस्था | Update - Jul 18, 2011, 03:54 AM IST

पीपीपी नेत्याच्या हत्येनंतर पाकिस्तानचे सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीत हिंसा भडकली आहे.

  • pakistan, karachi, rada, 11 killed

    कराची: पीपीपी नेत्याच्या हत्येनंतर पाकिस्तानचे सर्वात मोठे शहर असलेल्या कराचीत हिंसा भडकली आहे. गेल्या चोवीस तासांत येथे ११ लोकांचा बळी गेला आहे. यात अनेकजण जखमी झाले. सरकारचा उपक्रम असलेल्या पीआयएच्या कामगार संघटनेचे प्रमुख व सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते आमीर शाह व त्यांचे मित्र यांना गुलिस्तान-ए-जौहर या भागात गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर हिंसाचार उसळला. दरम्यान, कराचीत शांतता राहावी यासाठी शांती रॅली काढण्यात आली.

Trending