आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात विशेष लष्करी कोर्टाचा मार्ग मोकळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात अतिरेक्यांशी संबंधित प्रकरणांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी विशेष लष्करी न्यायालयाची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शुक्रवारी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी आपल्या निवासस्थानी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.

बैठकीत सहभागी सर्व राजकीय नेत्यांनी यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यासंदर्भातील विधेयक नॅशनल असेंब्लीत मांडले जाईल. मंगळवारी ते सिनेटमध्ये मांडले जाणार आहे. संसदेत यावर चर्चेची गरज नाही. केवळ मंजूर करण्याची आैपचारिकता आहे, असे शरीफ यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय बैठकीत लष्करप्रमुख राहिल शरीफदेखील सहभागी झाले होते. लष्करी कोर्ट स्थापन करावे, ही लष्कराची अजिबात इच्छा नाही; परंतु असे कोर्ट स्थापन करणे काळाची आणि वेळेची मागणी आहे. अशा प्रकारची यंत्रणा सुरू झाली नाही तर एक दिवस सर्व संपून जाईल. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर देश पूर्वीच्या स्थितीत परतेल. सध्या देश नाजूक परिस्थितीतून वाटचाल करत आहे. अशा काळात निर्णायक होणे गरजेचे आहे. स्थापनेला निवृत्त सरन्यायाधीश चौधरी इफ्तिखार यांनी बेकायदा ठरवले आहे.

लख्वीच्या जामिनाला सरकारचे आव्हान
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड लख्वी याच्या जामिनाला शनिवारी पाकिस्तान सरकारने इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले. दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयात सरकारने अपील केले आहे, अशी माहिती सरकारी वकील चौधरी अझर यांनी दिली.