इस्लामाबाद - पाकिस्तानमधीलिचघळलेले आंदोलन आणि राजकीय पेच अद्याप काही सुटलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर ‘तेहरिक-ए-इन्साफ’चे नेते इम्रान खान ताहिर-उल- कादरी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या दबावाखाली झुकण्याची स्पष्ट भूमिका पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मंगळवारी घेतली. राजीनामाही देणार नाही आणि सुटीवर जाण्याचाही प्रश्न नसल्याचे शरीफ यांनी सांगितले.
शरीफ यांनी पाकमधील राजकीय पक्षाच्या नेत्यांसमोर बोलताना काही लोकांनी संपूर्ण देशाने निवडून दिलेल्या सरकारवर दबाव आणून ते पाडण्याचा घातक पायंडा
आपण देशामध्ये पडू देणार नाही, अशी स्पष्टोक्ती केली. ते मंगळवारी संसदेच्या संयुक्त बैठकीत बोलत होते. देशामध्ये राज्यघटनेचे महत्त्व आहे त्याच्या विरोधी काम आपण होऊ देणार नाही, असे ते म्हणाले. पाकिस्तानचे भविष्य हे लोकशाहीशी निगडित असून मार्ग भरकटल्यास अशी परिस्थिती देशासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. दरम्यान, सोमवारच्या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी २०० जणांना अटक केली. रविवारपासून आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.
समर्थनासाठी बैठक
लोकशाहीच्याबचावासाठी पंतप्रधानांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी काही राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सय्यद खुर्शीद शाह, महमूद खान अचकझाई, मौलाना फझलूर रेहमान, इजाझूल हक, बाबर खान घौरी, डॉ. फारूक सत्तार, आफताब अहमद खान शेर्पाओ, मीर हासील बिझेंजो, हाजी अदिल, हाजी गुलाम अहमद बिलोर, अब्बास खान आफ्रिदी आणि गाझी गुलाब जमाल हे पाकमधील महत्त्वाचे राजकीय नेते या बैठकीस उपस्थित होते.
देशद्रोह
विरोधकांचेआंदोलन आता लोकशाही मार्गाने जाताना िदसत नाही. ही कृती देशद्राेहाशी संबंधित आहे, अशा शब्दांत मंगळवारी सरकारने आपली भूमिका मांडली. सोमवारी आंदोलकांनी पीटीव्ही कार्यालय, संसद, सर्वोच्च न्यायालयावर ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर टीव्ही कार्यालयास लष्कराने ताब्यात घेतल्याचे िदसून आले. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास काही आंदोलकांनी टीव्ही कार्यालयावर हल्लोबोल केला होता.
छायाचित्र - कादरी यांच्या तंबूत संसदेसमोरील निदर्शकांच्या तंबूत धर्मगुरू तहिर-उल-कादरी यांचे समर्थक भल्या सकाळीच वृत्तपत्र वाचताना.