आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan \'Long March\' Protest Draws Tens Of Thousands To Capital

निवडणूक सुधारणांसाठी पाकिस्तानमध्ये लाँग मार्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानात लवकरच सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तेथे निवडणूक सुधारणांचे जोरदार वारे वाहू लागले आहे. मौलवी डॉ. ताहीर-उल-कादरी यांची संघटना तहरीक मिनहाजुल कुराणने रविवारी लाहोर ते इस्लामाबाद असा लाँगमार्च काढला आहे.

निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करावी, या मागणीसाठी त्यांनी हा मार्च काढला आहे. मागण्या मान्य होत नाही तो आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रॅलीचा प्रतिसाद वरचेवर वाढत आहे. लाहोर ते इस्लामाबाद हे अंतर 377 कि.मी.चे आहे. आपल्या रॅलीला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून धास्तावलेल्या सरकारने आपला मार्ग अडवण्याचे काम करू नये, आपल्या या रॅलीत 40 लाखांच्या वर लोक सहभागी होतील, असा दावा डॉ. कादरी यांनी केला आहे.