आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानकडेही रासायनिक अस्त्रे, अमेरिकेला मात्र चिंतेचे ग्रहण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सिरिया, इस्रायल आदी देशांव्यतिरिक्त पाकिस्तानमध्येही रासायनिक शस्त्रे असण्याची शक्यता आहे. अमेरिकेला पाकिस्तानच्या आण्विक, रासायनिक व जैविक शस्त्रांबाबत चिंता असल्यामुळे त्यावर त्यांची निगराणी आहे. सीआयएचा माजी एजंट एडवर्ड स्नोडेनने उपलब्ध केलेल्या दस्तऐवजांच्या आधारे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून ही माहिती समोर आली आहे. अमेरिका अल कायदा, इराण, उत्तर कोरियाप्रमाणे पाकिस्तानवरही संशय व्यक्त करत असल्याचे यातून स्पष्ट होते. याच्या हेरगिरीसाठी अमेरिकेने 52.6 अब्ज डॉलरची आर्थिक तरतूद केली आहे.


‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात कधीही जाऊ शकतील, अशी अमेरिकेला भीती आहे. यामध्ये अमेरिकी गुप्तचर विभागाचे गुप्तचर अर्थसंकल्प ‘ब्लॅक बजेट’च्या 178 पानी अहवालाच्या सारांशाचा हवाला देण्यात आला आहे. अमेरिकेला पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांबद्दल चिंता आहे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. अमेरिकेने पहिल्यांदाच पाकिस्तानच्या रासायनिक व जैविक शस्त्रांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हल्ल्यामुळे ज्या भागात जीवित हानी होऊ शकते, त्यावर हेरगिरी केली जाऊ शकते. त्यानुसार भारताच्या अणु कार्यक्रमावरही अमेरिकेची नजर आहे. मात्र, त्याची माहिती यात दिली नाही.