आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan May Rake Up Kashmir Issue At United Nations

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

UN मध्ये पाकिस्तान उपस्थित करणार काश्मीर मुद्दा, चोख उत्तर देण्याची भारताची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात काश्मिरचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगून पाकिस्तानच्या राजनितीज्ञांनी वातावरण तापवले आहे. भारतानेही या मुद्यावर पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची तयारी केली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिवेशनात भारताचे एक ज्येष्ठ अधिकारी पाकिस्तानला उत्तर देतील. त्याआधी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती आणि दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांची बातचीत रद्द होण्यासाठी पाकिस्तानलाच जबाबदार ठरविले होते. स्वराज म्हणाल्या होत्या, बंडखोर नेत्यांशी चर्चा करून पाकिस्तानने चांगले संबंध बिघडवले होते.
पाकिस्तान उपस्थित करणार काश्मीर मुद्दा
पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांना जेव्हा विचारण्यात आले, की पंतप्रधान नवाज शरीफ संयुक्त राष्ट्रसंघात 26 सप्टेंबर रोजी त्यांच्या भाषणात काश्मीर मुद्या उपस्थित करणार, त्यावर ते म्हणाले, 'शरीफ यांनी त्यांच्या भाषणात काश्मीरचा मद्दा करु नये असे काही नाही.' चौधरी म्हणाले, जनमत संग्रह करणे हे आजही काश्मीर प्रश्नावरील उत्तर आहे. भारतासोबतच्या बातचीतवर ते म्हणाले, चर्चेला सुरवात होण्यासाठी आता भारताकडून पाऊल उचलेल गेले पाहिजे. ते म्हणाले, 'दोन्ही देशांमधील बातचीतवर चर्चा करण्याची जबाबदारी आता भारतावर आहे. जर भारताने याबाबत एक पाऊल पुढे टाकले तर, पाकिस्तान त्यावर विचार करेल. कारण परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चेला भारताने पूर्णविराम दिला आहे.'
स्वराज यांचा पाकिस्तानवर निशाणा
त्याआधी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी द्विपक्षीय चर्चेच्या मुद्यावर पाकिस्तानवर निशाणा साधला आणि चर्चा बंद होण्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरविले. सुषमा स्वराज म्हणाल्या, 'गेल्या महिन्यात इस्लामाबादमध्ये भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची भेट होणार होती. मात्र, पाकिस्तानने त्याआधी हुर्रियत नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली आणि या भेटीवर पाणी पडले. नव्या सरकारने एक नवा संकेत दिला होता, मात्र त्यांनी (पाकिस्तान) संपूर्ण प्रक्रियाच बंद करुन टाकली.'