आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Media Coverage On Narendra Modi And Rahul Gandhi

मोदी भारतातील तालिबानी, पाक पत्रकारांचे मत, वाचा REPORT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. भारतीय मीडियानुसार, देशात नरेंद्र मोदींची लाट आहे. परंतु पाकिस्तानी मीडियाने नरेंद्र मोदी यांची तुलना तालिबानींशी केली आहे. भारतात मोदींची लाट नसल्याचे सांगत गुजरातमधील दंगलीला तेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

भारतातील लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण जगातील मीडियाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यात मध्य-पूर्व पाकिस्तानी मीडियात आजही नरेंद्र मोदींना कट्टर हिंदूत्त्ववादी म्हणून संबोधिले जाते. सौदी अरबमधून प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र 'अल अरबिया'चे संपादक मन्सूर जाफर यांनी लिहिले आहे, की येत्या 16 मे रोजी हिंदुत्त्ववादी नरेंद्र मोदींचा फैसला होणार आहे. जफर यांच्यामते, भारतात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीवर पाकिस्तानच्या राजकारणाचा प्रभाव आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तान अमे‍रिकेला सहकार्य करत आहे. तर दुसरीकडे बलुचिस्थान आणि खैबर पख्तुनखॉंमध्ये घुसखोरी करणार्‍या हिंदुत्त्ववाद्यांना भारत आर्थिक मदत करत असल्याचा आरोप केला आहे.

इंग्रजी वृत्तपत्र 'डॉन'चे पत्रकार जावेद नकवी यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना तालिबानींशी केली आहे. भारतात नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास जर्मनीत पुन्हा नाझींचे सरकार आल्याचा जनतेला अनुभव आल्याशिवाय रााहणार नाही.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, नरेंद्र मोदींबाबत पाकिस्तानी पत्रकारांचे मत...