आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Mob Kills Woman Over Alleged Blasphemy, Divya Marathi

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने पाकिस्तानमध्‍ये तिघांची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्‍ये फेसबुकवर'धर्मविषयक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याने अहमदी समुदायाच्या तीन सदस्यांची हत्या करण्‍यात आली.यात दोन अल्पवयस्क मुलांचा समावेश होता. ही घटना इस्लामाबादपासून 220 किलोमीटर दूर असलेल्या गुजरान्वालामध्‍ये घडली.

रविवारी(ता.27) फेसबुकवर धर्मविषयक आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्यावरून वाद सुरू झाला आणि त्याचे संघर्षात रूपांतर झाले असे पोलिसांनी सांगितले. यात अनेक लोक जखमी झाले. मृतांमध्‍ये 55 वर्षांची बशीरन नावाची महिला, चिमुकली हीरा आणि तिची बह‍ीण कनट यांचा समावेश आहे. जवळ-जवळ 150 लोकांचा गट धर्मद्वेषी पोस्ट करणा-या आरोप्यांविरूध्‍द खटला दाखल करण्‍यासाठी पोलीस ठाण्‍यात आले होते, असे नाव जाहीर न करण्‍याच्या अटीवर एका पोलिस कॉंस्टेबलने सांगितले. दुस-या गटाने तोपर्यंत अहमदी समुदायाच्या लोकांवर हल्ला केला व त्यांची घरे पेटून दिली.

या आगीत मृत्यूमुखी पडलेले अहमदी समुदायाचे लोक होते. जे स्वत:ला मुस्लिम मानत नाहीत आणि त्यांचा पैगंबरावरही विश्‍वास नाही. 1984 मधील पाकिस्तानच्या एका कायद्यानुसार अहमदी समुदायाला बिगर मुस्लिम म्हणून घोषित करण्‍यात आले आहे. पाकिस्तानी त्यांना निधर्मी मानतात. पाकिस्तानी कायद्यानुसार मुस्लिम चालीरिती पाळण्‍यास या समुदायाला कायद्याने बंदी आहे. फेसबुकवर धर्मद्वेषी मजकूर पोस्ट करणारा आरोपी सुरक्षित असल्याचे पोलिस कर्मचा-याने सांगितले.