आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात जजवर हल्ला; सात ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - न्यायाधीशांना लक्ष्य करून मोटारसायकल बॉम्बद्वारे घडवून आणलेल्या स्फोटात सात नागरिक ठार झाले. या घटनेत वरिष्ठ न्यायाधीश गंभीर जखमी झाले. सिंध उच्च न्यायालयातील न्या. मकबूल बाकर सकाळी कारने कोर्टात जाण्यासाठी निघाले तेव्हा मोटारसायकलचा स्फोट झाला. यामध्ये किमान 15 नागरिक जखमी झाले. जखमींमध्ये चार पोलिस व निमलष्करी दलातील जवानांचा समावेश आहे. न्या. बाकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यांच्या वाहनचालकाचा मृत्यू झाला.