आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan: Nawaz Sharif Party Consolidates Grip On Power With New Votes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोटनिवडणुकीत नवाझ शरीफ यांच्या पक्षाचे वर्चस्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानात संसदेचे कनिष्ठ सभागृह व प्रांतिक सभागृहाच्या 41 मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाने आघाडी घेतली आहे. नॅशनल असेंब्लीच्या 15 तर प्रांतिक सभागृहाच्या 26 मतदारसंघांसाठी ही निवडणूक झाली. त्यापैकी 39 जागांचे निकाल जाहीर झाले असून नॅशनल असेंब्ली आणि प्रांतिक कायदेमंडळांमध्ये एकूण 18 जागा शरीफ यांच्या पाकिस्तानी मुस्लिम लीग पक्षाला मिळाल्या आहेत. काही भागांत महिलांना मतदान करण्यास दहशतवाद्यांकडून मनाई करण्यात आल्याने तेथील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. इम्रान खानच्या तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने नॅशनल असेंब्लीच्या महत्त्वाच्या दोन जागा गमावल्या आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाला पंजाबमधील तीन जागा गमवाव्या लागल्या आहेत.