आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तान: पुनर्जन्माचे आमिष दाखवून अनुयायाची हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - शिष्याला पुनर्जन्माचे वचन देऊन त्याची हत्या करणा-या पाकिस्तानी भोंदूबाबाला गुरुवारी अटक करण्यात आली. मुल्तानमधील मुबारकबाद गावचा पीर मुहंमद साबीर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पीर मुहंमद गेल्या पाच वर्षांत विविध चमत्कार दाखवत या भागात लोकप्रिय झाला हाेता. आठवड्याच्या सुरुवातीस त्याने मुले असणारा विवाहित मृत्यूस तयार असेल तर त्याचा पुनर्जन्म करण्याचा दावा केला होता. सहा अपत्यांचा पिता असणा-या मुहंमद नियाझने(४०) त्यास होकार दर्शविला. बुधवारी नियाझला एका टेबलवर ठेवले आिण हातपाय बांधले.