पेशावर - वायव्य पाकिस्तानातील शहरात सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यात एका लहान मुलासह तीन जणांचा मृत्यू झाला असून अन्य १३ जण जखमी झाले आहेत. पोलिस शहरप्रमुख एजाज खान यांनी घटनास्थळाला भेट दिली व मारेक-यांना ब्रिगेडियर खालीद जावेद यांना मारायचे होते, असा अंदाज वर्तवला. परंतु या स्फोटात ते बचावले. या घटनेत दगावलेल्यांमध्ये एका सीमा सुरक्षा जवानाचा समावेश आहे.
मृतांमध्ये एका महिलेसह मुलाचाही समावेश आहे. उत्तर वझिरीस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईचे हे पडसाद असू शकतात.