आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Divya Marathi, Imran KHan, PTI

नवव्या दिवशीही इस्लामाबादेत सरकार विरोधी निदर्शने चालूच, मध्‍यस्थी करण्‍यास अमेरिकेचा नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद / वॉशिंग्टन - पाकिस्तानातील राजकीय संघर्ष इतक्यात तरी मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. सलग नवव्या दिवशीही राजधानीत सरकारच्या विरोधात निदर्शने सुरूच होती. दुसरीकडे अमेरिकेने शुक्रवारी मध्यस्थी करण्यास स्पष्ट नकार दिला.

गेल्या गुरुवारपासून हे आंदोलन सुरू आहे. इम्रान खान आणि कॅनडातील धर्मगुरू ताहिरुल कादरी यांच्या नेतृत्वाखालील दोन वेगवेगळ्या आंदोलनांनी राजधानी हादरून गेली आहे. सुरक्षेसाठी आठवड्यापासून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या गुरुवारी लाहोरमधून इस्लामाबादमध्ये एक मार्च काढण्यात आला होता. हजारो आंदोलक रस्त्यावर उतरून इम्रान-कादरी यांच्या मागणीला पाठिंबा देत नवाझ शरीफ सरकारने राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी करत आहेत. आंदोलक रेड झोन असलेल्या इमारतींच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असल्याने तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेिरकेने सरकार आणि आंदोलकांना चर्चेतून तोडगा काढण्याचे आवाहन केले. मध्यस्थी करणार नसल्याचेही स्पष्ट केले. चर्चेला वाव असला पाहिजे. त्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी प्रयत्न होण्याची गरज परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मेरी हाफ यांनी व्यक्त केली आहे.

राजीनाम्यातून दबाव
इम्रानखान यांच्या पक्षाने शरीफ सरकारवर दबाव वाढवण्यासाठी संसदीय पातळीवरूनदेखील प्रयत्न सुरू केले आहेत. म्हणूनच शुक्रवारी पक्षाच्या खासदारांनी नॅशनल असेंब्लीच्या सदस्यत्वाचे राजीनामे दिले. तहरिक-ए-इन्साफचे (पीटीआय) ३४ संसद सदस्य असून यात खान यांचाही समावेश आहे. राजीनाम्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही.

लाइव्ह कव्वाली
आंदोलकांनीराजधानीत गुरुवारी रात्री मनोरंजन कार्यक्रमाचा आनंद घेतला. खान यांच्या कॅम्पवर रॉक स्टार सलमान अहमद याने लाइव्ह परफॉर्म केले. कादरी यांच्या कॅम्पमध्ये समर्थकांनी कव्वालीचा आनंद लुटला. रात्री उशिरापर्यंत नाचगाणे सुरू होते.