इस्लामाबाद - पाकिस्तानातील दक्षिण पंजाब प्रांतातील पुराने ३०० जणांचा बळी घेतल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. नद्यांच्या वाढत्या पातळीचा तडाखा पंजाब, पाकव्याप्त काश्मीर, गिलीत बलिस्तान, दक्षणि सिंध येथील २ कोटी नागरिकांना बसला आहे. ३ सप्टेंबरपासून येथे अतिवृष्टी झाल्याने १.५ कोटी एकरांवरील पिकांचेही नुकसान झाले आहे.
सियालकोट व गुजरानवाला येथील पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे पाकच्या राष्ट्रीय
आपत्ती व्यवस्थापन िवभागाच्या रिमा झुबारी यांनी सांगितले.