आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Hacker Online Squad, Divya Marathi

ब्लॅक टायगर इंडियनकडून पाकिस्तान रेल्वेची वेबसाइट हॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका भारतीय हॅकर्स गटाने पाकिस्तान रेल्वेची वेबसाइट हॅक केली आहे. या वेबसाइटवर भारतीय तिरंग्यासोबत काही संदेशही टाकण्यात आले आहेत. ‘ब्लॅक टायगर इंडियन हॅकर ऑनलाईन स्क्वॉड’ या गटाने या सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

एका पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार, वेबसाइट हॅक करणा-या गटाने होमपेजवर संदेश टाकला आहे. ‘पाकिस्तानी नागरिकहो, हॅलो... ही वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. भारतीय काश्मीरमध्ये कित्येक वर्षांपासून पाकिस्तान कुरापती काढून कारवाया करत आहे. या भागात रक्ताचे पाट वाहत आहेत. तुमचे सायबर बांधव भारतीय सरकारी वेबसाइटस्ही हॅक करत आहेत... ’ इस्लाम आणि मुस्लिमांबद्दल आपल्या मनात आदर व प्रेम असला तरी पाकिस्तानबद्दल आपल्या मनात द्वेष असल्याचे हॅकर्सनी संदेशात नमूद केले आहे. एवढेच नव्हे, तर पाकच्या वीज कंपन्या आणि व्यावसायिक बँकांच्या वेबसाइटस्ही हॅक केल्या जातील, असा इशारा या गटाने दिला आहे. याच गटाने यापूर्वी बांगला देशाची एक सरकारी वेबसाइट हॅक केली होती.