आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Imran Khan, Divya Marathi

इम्रानचा मोर्चा संसदेच्या दिशेन, पाकिस्तानी राजधानीतील रेड झोनमध्ये तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाने मंगळवारी राजधानीत आणखीनच तणाव वाढला. विरोधी नेते इम्रान खान यांच्या आदेशावर त्यांचे हजारो समर्थक रेड झोन असणा-या संसद परिसराच्या दिशेने वळल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. दुसरीकडे कॅनडातील धर्मगुरू ताहिर-उल कादरी यांनी पर्यायी संसद स्थापन करण्याचे जाहीर केले.

इंशाल्लाह आजचे आझादी आंदोलन अहिंसक राहिले. आता कार्यकर्ते संसदेच्या दुस-या दालनाकडे जातील. आमचे आंदोलन घटनात्मक आणि लोकशाहीला धरून आहे, असे खान यांनी ट्विट करून स्पष्ट केले. वास्तविक राजधानीला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. शहराच्या रेड झोन भागातील सुप्रीम कोर्ट, संसद, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधानांचे निवासस्थान, राजदूत कार्यालयासह महत्त्वाच्या इमारतींना संरक्षण देण्यात आले आहे.

‘अवामी पार्लमेंट ’ : कादरी यांनी पर्यायी संसद स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे. त्यास अवामी पार्लमेंट असे नाव देण्यात येईल. दुसरीकडे कादरी यांनी सरकारी प्रतिनिधींशी चर्चा करण्यास मंगळवारी नकार दिला. आम्ही सरकारला सत्ता सोडण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. ही मुदत सोमवारी सायंकाळी संपली, असे कादरी यांचे म्हणणे आहे.

काय आहे वाद ? : 2013 मध्ये पाकिस्तानात झालेल्या निवडणुकीत नियमांचा भंग करण्यात आला. मतदान प्रक्रियेत गडबड झाल्यामुळेच सत्ताधारी पाकिस्तानी मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाला 190 जागी विजय मिळाला. शरीफ यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी इम्रान खान आणि कादरी यांनी केली आहे.