आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Islamia University, Divya Marathi

पाकिस्तान: तालिबानने कुलगुरुंची केली मुक्तता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - चार वर्षांपूर्वी तालिबानच्या दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या इस्लामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंची गुरुवारी(ता.28) मुक्तता करण्‍यात आली, असे डॉन डॉट कॉम या संकेतस्थळाच्या वृत्तात सांगण्‍यात आले. कुलगुरु अजमल खान यांची 8 सप्टेंबर, 2010 मध्‍ये अपहरण करण्‍यात आले होते. तेव्हापासून लष्‍कर आणि गुप्तचर संस्था त्यांचा शोध घेत होती, असे अंतर्गत जनसंपर्क विभागाने प्रसिध्‍द केलेल्या प्रसिध्‍द पत्रकात म्हटले आहे. नागरी संस्था आणि खान यांच्या नातेवाइकांनी अविरत केलेल्या शोधकार्याचे प्रशंसा केली आहे.