आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Jammu And Kashmir, Divya Marathi

पाकिस्तान म्हणतो, काश्मीर गळ्याची रक्तवाहिनी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानी लष्करप्रमुख राहिल शरीफ यांच्या काश्मीरविषयी वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची रक्तवाहिनी असल्याचे त्यांनी म्हटले. भारताने यावर आक्षेप घेत त्यांचे वक्तव्य वादग्रस्त असल्याचे म्हटले असून, काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे.

शरीफ यांच्या या वक्तव्याचा कॉँग्रेस प्रवक्ते राशीद अल्वी यांनी चांगलाच समाचार घेतला. पाकिस्तान जर काश्मीरला गळ्याची रक्तवाहिनी समजत असेल, तर ती रक्तवाहिनी तोडण्याची भारतात ताकद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रावळपिंडी येथे बुधवारी पाक लष्कराच्या मुख्यालयात शहीद दिनप्रसंगी शरीफ यांनी हे वक्तव्य केले. काश्मिरी नागरिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नसल्याचे बेताल वक्तव्य शरीफ यांनी केले.