आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Pakistan Television, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इम्रान खान, कादरी यांच्यावर दहशतवादी गुन्हा दाखल, पाकमध्‍ये आंदोलन मात्र सुरुच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इम्रान खान पंतप्रधान निवासाजवळ समर्थकांना संबोधित करताना.. छायाचित्र : एएफपी )
इस्लामाबाद - इम्रान खान, तहीर-उल-कादरी यांच्याविरुध्‍द पाकिस्तानमध्‍ये सोमवारी ( ता. एक) दहशतवादी गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. सध्‍या इस्लामाबादमध्‍ये नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्या कर‍िता आंदोलन चालूच आहे.हे दोन नेते आणि त्यांचे कार्यकर्त्यांच्याविरुध्‍द अनुच्छेद 182- 31/8 अनुसार सचिवालय पोलिस स्टेशनमध्‍ये गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.
राजधानीत आंदोलन सुरु असताना पंतप्रधान शरीफ आणि लष्‍कर प्रमुख राहील शरीफ यांची पंतप्रधान निवासस्थानी चाललेली बैठक समाप्त झाली आहे.सोमवारी दुपारी पाकिस्तान टीव्हीच्या (पीटीव्ही) कार्यालयात आंदोलकांनी प्रवेश करून वाहिनीचे प्रसारण बंद पाडले होते, असे डॉन वृत्तपत्राने आपल्या वृत्तात सांगितले. पाकिस्तानी लष्‍कराने पीटीव्हीच्या मुख्‍यालय आंदोलकांवर कारवाई करुन त्यावर नियंत्रण मिळवले आहे.

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाने सोमवारी (ता. 1) वेगळेच वळण घेतले. मागील 48 तासांमध्‍ये पाकिस्तान तेहरिक-इ-इन्साफ (पीटीआय) आणि पाकिस्तान अवामी तेहरिक (पॅट) च्या सरकारव‍िरोधी मोर्चाने इस्लामाबादमधील रेड झोनचे युध्‍द भूमीत बदलले आहे. यात 3 आंदोलक आणि 100 जखमी झाले. इम्रान खान आणि तहीरुल कादरी या दोघांनी आपल्या समर्थकांना आंदोलन चालू ठेवण्‍याचे सांगितले आहे. दुसरीकडे सरकारशी वाटाघाटी पुढे सरकताना दिसत नाही. यात पाकिस्तानचे लष्‍कर मध्‍यस्थी करत आहे.

शरीफ यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलक सरकारी कार्यालयांच्या बाहेर ठाण मांडून बसलेले आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, PTVच्या कार्यालयात घुसलेले कार्यकर्ते... आणि रस्त्यांवर सुरु असलेले आंदोलन...
स्त्रोत : dawan.com