आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Pakistani Military, America, Divya Marathi

पाकिस्तानी लष्कर व ड्रोन हल्ल्यात 55 दहशतवादी ठार, अफगाण सीमेवर कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानात लष्कराने आदिवासी भागात बुधवारी हल्ला करून तालिबानच्या 35 दहशतवाद्यांना ठार केले. या घटनेपूर्वी काही तास आधी अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात 20 जण ठार झाले. बुधवारच्या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिकही मारले गेले.

लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या लढाऊ विमानांनी बुधवारी अफगाणिस्तानच्या पकतिया प्रांताला लागून असलेल्या शवाल खो-यात बॉम्बहल्ले केले. तालिबानी दहशतवाद्यांच्या विरोधात हा हल्ला होता. त्यात चेचेन्या, उझबेकिस्तान आणि अरबी दहशतवाद्यांचा समावेश होता. या सर्व दहशतवाद्यांनी लष्करी कारवाई सुरू झाल्यानंतर मीर अली आणि मिरानशाह येथून शवाल खो-यात आश्रय घेतला होता.

पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्याच्या काही तास आधी उत्तर वजिरीस्तानच्या दत्ता खेलमध्ये अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी हल्ले केले. त्यात 20 जण ठार झाले. या ड्रोन हल्ल्यांशी आपला काहीही संबंध नाही, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे. पाकिस्तान ड्रोन हल्ल्यांचा सातत्याने विरोध करत आला आहे, पण पाकने अफगाण सीमेवरील दहशतवाद्यांचा खात्मा करणेही आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे.

15 जूनपासून मोहीम
पाकिस्तानने 15 जूनपासून दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. या मोहिमेदरम्यान आतापर्यंत 447 पेक्षा जास्त जण मारले गेले आहेत. लष्कराने दहशतवाद्यांचे 88 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.