आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, Parvez Mushraf, Pakistan, DIvya Marathi

मोदींना पत्ते उघडू द्या, परवेझ मुशर्रफ यांचा पा‍किस्तान सरकारला सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करशहा जनरल परवेझ मुशर्रफ यांनी भारतासह आपल्या देशातील सरकारला इशारा देऊन उसणे अवसान आणले आहे. भारतीय पंतप्रधान मोदी यांना सुरुवातीस पत्ते उघडू द्या. स्वत: त्यांच्याकडे जाऊन त्यांना व्हाइसरॉय करू नका, त्यांची मिन्नतवारी करू नका, असा पाकिस्तान सरकारला सल्ला दिला आहे.

मुशर्रफ म्हणाले, की भारत आणि मोदींना आमच्याबाबत कोणताही संशय येण्याचे कारण नाही. आमचाही २० कोटी लोकांचा देश आहे. पाकिस्तानही अण्वस्त्रसज्ज आहे. त्यामुळे मोदी यांनी कोणतीही चूक करू नये. त्यांनी मोदींना मुस्लिम पाकिस्तानविरोधी ठरवले. मुशर्रफ यांनी मंगळवारी रात्री एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वादग्रस्त वक्तव्य केले.
मोदी हे पक्के राष्ट्रभक्त : हुसेन
मुशर्रफ यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन नवी दिल्लीत म्हणाले, की पंतप्रधान मोदी पक्के राष्ट्रभक्त आहेत. ते भारतविरोधी कारवाया खपवून घेणार नाहीत. मात्र, पाकिस्तान आमच्या प्रकरणात हस्तक्षेप करणार नसेल आणि सीमेवर शांतता ठेवणार असेल तर त्यांचा विरोध करणार नाहीत.
मुशर्रफ यांच्या वक्तव्याचे कारण
मोदी यांनी काश्मीरमधील एका कार्यक्रमात म्हटले की, पाकिस्तानमध्ये समोरासमोर लढाईची हिंमत नाही. त्यामुळे ते अशा कारवाया करत आहे. मुशर्रफ यांनी या घटना आणि मोदींच्या वक्तव्यावर वरील मत व्यक्त केले. म्हणाले, मोदी आता पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांनी अद्याप पाकिस्तान आणि मुस्लिमांबाबत आपले धोरण जाहीर केले नाही.
आंदोलनास पाठिंबा : मुशर्रफयांनी पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. इस्लामाबादमध्ये शरीफ यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इम्रान खान आणि ताहिर-उल-कादरी यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरू आहे.