आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan News In Marathi, President, Prime Minister, Electricity Bill, Divya Marathi

पाक राष्‍ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांची होणार ‘बत्ती गुल’,वीज ब‍िले न दिल्याने होणार कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - कोट्यवधींची वीज बिले थकवल्याप्रकरणी पाकिस्तानी राष्‍ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांच्या घराची ‘बत्ती गुल’ करण्याचे तेथील वीज वितरण कंपनीने आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधानांच्या सचिवालयासह 18 विविध महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांचेही वीज कनेक्शन तोडले जाणार आहे.
संसदेतील काही भाग आणि मुख्य न्यायाधीशांच्या सरकारी निवासस्थानाचेही वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी आणि वीज वितरण राज्य मंत्री आबिद शेर अली यांनी दिली आहे. अलींच्या मते, पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या सांगण्यावरून वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले असून, इस्लामाबाद विद्युत वितरण कंपनीच्या (आयईएससीओ) मते, पंतप्रधानांच्या सचिवालयाचेच 62 लाखांचे वीज बिल थकित आहे, तर मुख्य न्यायाधीशांच्या निवासस्थानाचे 11 लाख रुपयांचे बिल अद्यापही भरण्यात आलले नाही.