आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती हल्ल्यात न्यायाधीशासह 11 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानी न्यायालयाच्या परिसरात सोमवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात एका न्यायाधीशासह 11 जण ठार, तर 25 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी न्यायालयीन आवारात ग्रेनेडसह तुफानी गोळीबार केला. त्यात दोन हल्लेखोरांनी स्वत:ला पेटवून स्फोट घडवला.


दोन बंदूकधा-यांनी स्वत:ला उडवून लावल्यामुळे याला आत्मघाती हल्लाच म्हटले पाहिजे, असे पोलिस महासंचालक सिकंदर हयात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्फोटानंतर 11 जणांचा मृत्यू, तर 25 जण जखमी झाल्याची माहिती पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉ. आयेशा यांनी दिली. मृतांमध्ये अतिरिक्त सत्र न्यायाधीशांचादेखील समावेश आहे. गृहमंत्री चौधरी निसार अली खान हे इस्लामाबादमध्ये दाखल झाल्याच्या दुस-या दिवशी ही घटना घडली. मोठ्या कालखंडानंतर इस्लामाबादमध्ये हा आत्मघाती हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी सुरुवातीला ग्रेनेडने हल्ला चढवला. त्यात बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यानंतर स्वत:ला पेटवून दिले. दरम्यान, तेहरिक-ए-तालिबानशी नवाज शरीफ सरकारची शांतता चर्चा फिसकटल्याने हा हल्ला आहे.