आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धाच्‍या धमकीनंतर पाकिस्‍तानने भारताजवळ उभारला विमानतळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकव्‍याप्‍त काश्मिरमध्‍ये गिलगिट भागात पाकिस्‍तानने एक मोठे विमान तळ उभारले आहे. पाकिस्‍तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांनी त्‍याचे उद्घाटन केले आहे. याचा वापर देशातील आणि आंतरराष्‍ट्रीय पर्यटकांसाठी होणार आहे. याच भागातील स्‍कार्दू या दुर्गम ठिकाणी जेट विमान उतरविण्‍याचे आपले स्‍वप्‍न असल्‍याचेही शरिफ यांनी सांगितले. दुसरीकडे पाकिस्‍तानातून आणखी एक धक्‍कादायक बातमी आहे. माजी लष्‍करप्रमुख अशफाक कयानी यांना दहशतवाद्यांनी धमकी दिल्‍यामुळे घर सोडावे लागले आहे.

नवाज शरिफ यांनी दोन दिवसांपूर्वी स्‍फोटक वक्तव्‍य केले होते. काश्मिरला भारतापासून स्‍वतंत्र झालेले आपल्‍याला पाहायचे आहे, असे ते म्‍हणाले होते. हा मुद्दा लवकरात लवकर सोडविण्‍यात आला नाही, तर भारत आणि पा‍किस्‍तानात चौथे युद्ध होऊ शकते, असे शरिफ म्‍हणाले होते. परंतु, पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्‍यांना सडेतोड उत्तर दिले होते. मी जिवंत असेपर्यंत पाकिस्‍तान कधीही भारतावर विजय मिळवू शकत नाही, असे पंतप्रधानांनी शरिफ यांना ठणकावले होते. त्‍यानंतर शरिफ यांनी घुमजाव करत नरमाईची भूमिका घेतली होती. गिलगिट हा आधी जम्‍मू आणि काश्मिरचा भाग होता. स्‍वातंत्र्याच्‍या सुरुवातीच्‍या काळात पाकिस्‍तानने त्‍यावर ताबा मिळविला होता. तेथे 5 शतकांपूर्वी हिंदू शासक होते.

गिलगिटचे भौगोलिक स्‍थान अतिशय महत्त्वचे आहे. बर्फाच्‍या वाळवंटात जुन्‍या सिल्‍क रूटवरील हे शहर आहे. हा परिसर नैसंर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. लष्‍करी वर्चस्‍वाच्‍या दृष्‍टीनेही हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे.

दहशतवाद्यांच्‍या धमकीमुळे पाकच्‍या लष्‍करप्रमुखांना सोडावे लागले घर... वाचा पुढील स्‍लाईड्स्‍मध्‍ये...