आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काश्मिरात जनमत चाचणी घ्या, नवाझ शरीफ यांनी UN मध्ये भारतविरोधी विष पेरले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क (अमेरिका)- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत भारताविरुद्ध तीन मुद्दे मांडले. त्यांनी काश्मिर राग आळवत जनमत चाचणी घेण्याची मागणी केली. भारत आणि पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील द्विपक्षीय चर्चा रद्द होण्याला भारताला जबाबदार ठरवले. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व देण्याच्या प्रस्तावाला फेटाळून लावले.
नवाझ शरीफ म्हटले, की संयुक्त राष्ट्रसंघात काही मोजक्या देशांच्या महत्त्वाकाक्षांवर विचार व्हायला नको तर सगळ्या सदस्यांच्या हितावर लक्ष द्यायला हवे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून संयुक्त राष्ट्रसंघात स्थायी जागा मिळण्यासाठी भारत प्रयत्न करीत आहे.
काश्मिरात जनमत चाचणी घ्यावी
काश्मिर प्रश्नावर नवाझ शरीफ यांनी भारतावर प्रखर टीका केली. काश्मिरच्या मुळ मुद्द्यावर पडदा टाकता येणार नाही. हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवावा, यासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे. ही समस्या सोडवणे आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे. यावेळी शरीफ म्हणाले, की काश्मिर वादातील आम्ही एक पक्ष असल्याने तेथे जनमत चाचणी व्हावी अशी आमची भूमिका आहे. काश्मिरमध्ये जनमत चाचणी घेण्यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघात प्रस्ताव मंजूर होऊन 60 वर्षे झाली आहेत. जम्मू आणि काश्मिरचे नागरिक या प्रस्तावाच्या अंमलबजावणीची वाट बघत आहेत. काश्मिरींच्या अनेक पिढ्या गुलामीत राहिल्या आहेत. त्यांच्यावर हिंसाचाराने हुकूमत गाजवण्यात आली आहे. त्यांच्या प्राथमिक हक्कांवर गदा आणली जात आहे. विशेष करुन काश्मिरी महिला मोठ्या संकटातून आणि अपमानातून बाहेर पडल्या आहेत.
चर्चा रद्द होण्याला भारत जबाबदार
पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी काश्मिरमधील फुटीरतावादी नेत्यांची भेट घेतल्यानंतर भारताने परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा बंद केली होती. याला पाकिस्तानने भारताला जबाबदारी धरले आहे. शरीफ म्हणाले, की दोन्ही देशांमधील पराराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा बंद होण्याचे आम्हाला दुःख आहे. एक संधी गमावल्याचे आंतरराष्ट्रीय समुदायालाही वाटले आहे. समस्या सोडवण्यासाठी आणि आर्थिक व व्यापारी अडचणींवर मात करण्यासाठी चर्चा एक महत्त्वपूर्ण घटक असल्याचे पाकिस्तानला वाटते. आपण शांततेच्या नियमला धाब्यावर बसवायला नको.
संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी जागेवर भारताला झटका
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतील सुधारणांना विरोध करीत शरीफ म्हणाले, की जागतिक संस्थेच्या सर्व सदस्यांच्या हितांच्या विचार करायला हवा. शरीफ म्हणाले, की संयुक्त राष्ट्रात होणाऱ्या सुधारणा व्यापक असायला हव्या. सुरक्षा परिषदेत सुधारणा करताना काही विशिष्ट नव्हे तर सर्व सदस्यांच्या हितांचा विचार केला जावा अशी आमची भूमिका आहे. सुरक्षा परिषदेत नवीन स्थायी सदस्यत्व कुणालाही देऊ नये. असे करणे लोकशाही संस्थेच्या मुल्यांविरुद्ध पाऊल उचलण्यासारखे असेल.
पुढील स्लाईडवर बघा, नवाझ शरीफ यांच्या अमेरिका दौऱ्याला नागरिकांचा विरोध....