आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Nawaz Sharif Turn Down Bulletproof Car By India In Nepal Summit

नवाझ शरीफ यांना नको भारताची बुलेटफ्रुप कार, नेपाळमध्ये स्वतःची कार आणणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू (नेपाळ)- पाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला अप्रत्यक्ष विरोध केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ पुढील आठवड्यात नेपाळची राजधानी काठमांडूत आयोजित करण्यात आलेल्या सार्क परिषदेत सहभागी होणार आहेत. यावेळी सार्क देशाच्या प्रमुखांना भारताकडून पुरवण्यात आलेल्या बुलेटफ्रुप कार देण्यात येणार आहेत. पण नवाझ शरीफ यांनी ही कार वापरण्यास नकार दिला आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
याबाबत नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते खगा नाथ अधिकारी म्हणाले, की नवाझ शरीफ त्यांची कार नेपाळमध्ये आणणार आहेत. सार्कच्या इतर राष्ट्रप्रमुखांना भारताने पुरवलेल्या कार दिल्या जातील. शरीफ स्वतःची कार आणणार हा काही मुद्दा नाही. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा जेथे जातात तेथे आपली कार घेऊन जातात. तसेच शरीफ यांनी केले आहे.
भारताला विरोध करण्यासाठी नवाझ शरीफ यांनी कार वापरण्यास इन्कार केल्याचे वृत्त अधिकारी यांनी फेटाळून लावले आहे. काठमांडूत 26 आणि 27 नोव्हेंबरला ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यात भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदिव, श्रीलंका, भुतान आणि पाकिस्तानचे प्रमुख सहभागी होणार आहेत.
पाकिस्तानने या महिन्यात अनेक वेळा शस्त्रसंधिचे उल्लंघन केले आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानने भारताची मदत न घेण्याची ही पहिली वेळ नाही. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये महापूर आला होता. यावेळी भारताने मदत दिली होती. ती पाकिस्तानने परत केली होती.