आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan PM Nawaz Sharif Urges 'new Beginning' With India

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय जवानांची हत्या करणार्‍या दुटप्पी पाकचा मैत्रीचा हात !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद/लाहोर - एकीकडे सीमेवर सतत कुरापती काढून भारतीय जवानांच्या हत्या करणार्‍या पाकचे दुटप्पी धोरण मंगळवारी पुन्हा स्पष्ट झाले. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मैत्रीचा हात पुढे करत नवी सुरुवात करण्याचे आवाहन केले. दरम्यान, शरीफ यांचे बंधू मुख्यमंत्री असलेल्या पंजाब असेंब्लित भारतविरोधी ठराव पारित करण्यात आला.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात शरीफ यांनी शेजारधर्म शिकवला. आपण चांगले मित्र व्हायला हवे, असे सांगत त्यांनी भारताशी मैत्रीची इच्छा बोलून दाखवली. दरम्यान, एकीकडे नवाझ शरीफ यांनी भारताशी मैत्रीचा हात पुढे केलेला असताना पाकच्या पंजाब प्रांतात असेंब्लिमध्ये भारताचा निषेध करणारा ठराव पारित करण्यात आला आहे.