आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan: Pregnant Woman Stoned To Death By Family

पाकिस्तानमध्ये प्रियकराशी लग्न केल्याने गर्भवती तरुणीची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. लाहोर उच्च न्यायालयाच्या आवारात 25 वर्षीय गर्भवती तरुणीची तिचे वडील आणि भावांनी दगडांनी ठेचून निर्घृण हत्या केली. कुटुंबाचा विरोध धुडकावून 45 वर्षीय मोहंमद इक्बाल याच्याशी तिने लग्न केले होते. ही तरुणी तीन महिन्यांची गर्भवती होती.
लाहोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ननकाना साहिब येथील रहिवासी फरजाना परवीन असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या कुटुंबीयांचा या लग्नाला प्रखर विरोध होता. त्यांनी इक्बालवर अपहरण आणि बळजबरीने लग्न करण्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात बयान देण्यासाठी फरजाना पतीसोबत लाहोर उच्च न्यायालयात आली होती.
फरजाना पतीसोबत न्यायालयाच्या बाहेर जात असताना सुमारे 20 जणांनी तिच्यावर जोरदार हल्ला चढवला. यात तिचे वडील आणि भाऊ सामिल होते. यावेळी या लोकांनी हवेत गोळीबार करीत दोघांना वेगवेगळे करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने तिला जोरदार मारहाण करण्यास सुरवात केली. या न्यायालयाजवळ एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तेथून विटा आणून तिच्यावर फेकण्यात आल्या.
इक्बालने सांगितले आहे, की पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर माझी फरजानासोबत भेट झाली होती. आमचे एकमेकांवर प्रेम आहे. पहिल्या लग्नातून मला पाच मुले आहेत. तिच्या कुटुंबीयांनी या लग्नासाठी मला पैसे मागितले होते. परंतु, मी पैसे दिले नाहीत आणि न्यायालयात रजिस्टर पद्धतीने लग्न केले.
अटक झाल्यावर मुलीच्या वडीलांनी सांगितले, की मी तिला ठार मारले याचा मला जराही पश्चाताप नाही.
पाकिस्तानमध्ये 2013 या वर्षी तब्बल 869 महिलांची ऑनर किलिंगच्या नावाखाली हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने दिली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला पाकिस्तानी समाजात वाईट समजले जाते, हे विशेष.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचे आणि महिलेचे फोटो...