आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात 60% रेकॉर्डब्रेक मतदान; कराचीत स्फोट, 17 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद, लाहोर- लोकशाहीसाठी आसुसलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी शनिवारी तालिबानींच्या धमक्यांना भीक न घालता अभूतपूर्व मतदान केले. जनतेचा उत्साह पाहून निवडणूक आयोगाने मतदानाची वेळ एक तासाने वाढवली. 60 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज निवडणूक आयोगाने वर्तवला आहे. लोकशाहीला ‘काफिरांची पद्धत’ समजणार्‍या तालिबान्यांनी कराचीत तीन बॉम्बस्फोट घडवले. या स्फ ोटासह देशभरातील हिंसाचारात 17 ठार झाले. उद्या रविवारी मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
नॅशनल असेंब्लीच्या एकूण 342 पैकी 272 जागा व बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतिक मंडळांसाठी शनिवारी सकाळी आठ वाजता मतदानास सुरुवात झाली. मतदारांमध्ये विशेषकरून महिला व तरुणांमध्ये अमाप उत्साह दिसत होता.इस्लामाबाद, लाहोर भागात भरभरून मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त फक्रुद्दीन जी. इब्राहिम यांनी सांगितले.

खैबर प्रांतात महिलांना बंदी
खैबर पख्तुनख्वा प्रांतात महिलांना मतदान करण्यास बंदी होती. तालिबान आणि अल-कायदाच्या दहशतवाद्यांचा हा गड समजला जातो. दीर, स्वात आणि मिरानशाह जिल्ह्यांमध्ये सकाळीच लाऊडस्पीकरवरून महिलांनी मतदानासाठी बाहेर पडू नये, अशी घोषणा करण्यात आली. आठवड्याच्या सुरुवातीला महिलांना मनाई करणारी पत्रकेही वाटण्यात आली होती.